सोलापूर : शांतीदूत परिवार आयोजित रक्तदान,सहज योग ध्यान शिबिर, लाठी,दांडपट्टा तलवार बाजी प्रात्यक्षिके व सेवा रत्न पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 28 एप्रिल रोजी ओम लान्स चौरस्ता येथे प्रमुख पाहुणे मा. आमदार प्रवीण स्वामी, मा. शरण पाटील संचालक विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम, सौ.अस्मिता गायकवाड सोलापूर अध्यक्षा रयत शांतीदूत परिवार महाराष्ट्र,डॉ. बिराजदार तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. विठ्ठल जाधव IPS, विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि. व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांच्या उपस्थितीत उमरगा तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 19 मान्यवरचा शांतीदूत परिवार सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


त्यात प्रामुख्याने अश्विनी भोसले पोलिस निरीक्षक उमरगा,सौ. शीतल रासकर SBI Manager उमरगा, नगरसेवक दळगडे, मुख्याध्यापक अजय गायकवाड,अमर सूर्यवंशी युवा सरपंच जकेकूर वाडी, सौ. मंजुषा चव्हाण, मोहियोद्दीन सुलतान, ऍड. दिलीप सगर, उद्योजक अनिल सगर शेखर अंबेकर (102 वेळा रक्तदान) डॉ. तुकाराम मोटे सह संचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य से. नि. अशोक जाधव आदि मान्यवरचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. युसुफ मुल्ला सर, मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे. प्रा. जीवन जाधव सर, अनिल सगर, मनीष माणिकवार, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, महंमद रफिक शेख, संतोष जाधव, प्रा. अभयकुमार हिरास सर, ऍड. इनामदार, प्राचार्य सोम महाजन सर, दिपक तपसाळे श्री गणेश मोरे, श्री नितीन गौरशेट्टी, मधू चौधरी पुणे, संतोष मोहिते,नसीरुद्दीन शेख आदि नी परिश्रम घेतले. प्रमुख शांतीदूत परिवार पदाधिकारी यांचा प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विठ्ठल जाधव IPS, विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि. यांना ग्लोबल एक्सेलनस पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ. अस्मिता ताई गायकवाड व Dnyaneshwar vidyalaya तुरोरी SSC 1980 बॅच तर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
