बार्शी : साला बाद प्रमाणे याही वर्षी बार्शी येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.बार्शी तालुक्याचे आमदार. दिलीप सोपल साहेब यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी न. पा. गटनेते नागेश अक्कलकोटे, प्रा. सूर्यकांत घुगरे, आनंद ठोकडे वकील, महेश कुंकूकरी, भीमाशंकर गुदगे, दिलीप महंकाळे, प्रशांत कानडे, रत्नाकर खोत, गवळी समाज्याचे अध्यक्ष हेमंत शाहीर, रामलिंग आंधळकर, खुडे सर, बसवेश्वर गाढवे, अण्णा पेठकर, प्रभुलिंग स्वामी, अभिजित गंगावणे, सोमनाथ बुचडे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बसवेश्वर चौकमध्ये आकर्षक विदयुत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती महात्मा बसवेश्वर समितीचे अध्यक्ष शिवम कुंकूकरी यांनी उपस्तित्यांचे स्वागत केले समितीचे स्वप्निल शिराळ, रुद्राक्ष गुळवे, यश नष्टे, विराज नांदेडकर, शंभु मारडकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.