अंबरनाथ : अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या १९७५ च्या १० वी एस. एस. सी.पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी,त्याच्या बॅच ला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सुवर्ण महोत्सवी स्नेह-संमेलन, शाळेत आयोजित केले.ज्या शाळेने आपल्या पुढील आयुष्यात सक्षमपणे उभे केले, त्याच शाळेत पुन्हा ५० वर्षांनी भेटण्याचा योग जुळून येणार होता.
स्नेह संम्मेलनसाठी तयारी दोन महिने अगोदर सुरु झाली. विद्यार्थ्यांची यादी बनविणे , त्यांना कॉल करणे , ठिकाण ठरविणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे, यामध्येच महिना गेला. सर्वांनाच उत्सुकता होती कि पन्नास वर्षांनंतर कसे दिसत असतील आपले शाळकरी मित्र. कार्यक्रमाची तयारी करण्यामध्ये, श्रीकांत कुलकर्णी, किरण रणदिवे, गणेश डाके, उमेश मथुरे, जयंत कुलकर्णी, नरेंद्र लेले, श्रीरंग पंडीत, अनघा लिखिते , जयश्री गुप्ते, सुनीता लोटलीकर , वैजयंती कांबळे, हे दररोज संपर्कात राहून आपापली कामे पूर्ण करत होते. आणि स्नेह संमेलनाचा दिवस ,२३ मार्च, उजाडला . एक एक जण येत होते , प्रत्येकाचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले जात होते. अतिशय उत्साहाने सुरुवात झाली होती. हास्य विनोद सुरु झाले व बघता बघता जवळ जवळ ७० च्या वर मुले/मुली जमले. कुणी पुणे/ नाशिक,बेळगाव,उगारखुर्द , असे लांबून लांबून खास उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि दीपप्रज्वलन होऊन,कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने दणक्यात झाली. त्यानंतर दिवंगत मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली देण्यात आली,
अनंत गवळीने खास बनवलेल्या प्रेसेंटेशन मुळे, दिवंगत मित्र मैत्रिणींचे फोटो पडद्यावर दिसत होते. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी द एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन श्री. अजित गोडबोले व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या गेल्या ५० वर्षातील प्रगतीची माहिती दिली. विद्यार्थ्यंनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेला एकूण ७२,०००/- ची देणगी दिली.
आता वेळ होती विद्यार्थ्यांच्या एकमेकांची पुन्हा ओळख करून देण्याची व विविध विषयांवर आपले विचार प्रगट करण्याची व धमाल करण्याची. विचार अभिव्यक्ती, कथा कथन, कविता,शेरो शायरी,या कार्यक्रमात, जयंत कुलकर्णी, रत्नाकर मोकाशी, विनय प्रधान, यांनी विविध विषयांवर आपले विचार प्रकट केले . विद्या नवांगुळ, विशाखा पाटील-गायकवाड, गणेश डाके, राजेंद्र कोरे यांनी कविता / शेरो शायरी सादर केल्या, तर अनघा लिखिते हिने सुंदर कथाकथन केले.उमेश मथुरेने निवडलेला मेनू सर्वांना आवडला. सर्वांनी जेवणाचा आस्वाद आपली वर्गातल्या बेंच वर बसून घेतला व सर्वांच्या जुन्या डबा खाण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
सुग्रास जेवणानंतर धमाल गाण्याचं कार्यक्रम झाला . राणी जोशीराव ( कश्मिरा जोशी ) , गणेश डाके , प्रकाश गोसावी, नंदू गुळवे ,विनय नागले , प्रशांत गडकरी, नितीन वैद्य,मेघा नूलकर, मंगल परिहार, श्रीकांत कुलकर्णी यांनी बहारदार गाणी सादर करून सर्व मित्र मैत्रिणींना मंत्रमुग्ध करून टाकले.
सर्वांनी शाळेतली आपली वर्गाला भेट देऊन,लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. सर्वांचे डोळे भरून आले होते, कारण आता कार्यक्रम संपवून निघण्याची वेळ झाली होती. दर वर्षी पुन्हा भेटण्याचे ठरवून संमेलनाचा समारोप झाला. किरण रणदिवे ने आभार प्रदर्शन केले व सर्वांना एक सुंदर भेट वस्तू देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत कुलकर्णी, किरण रणदिवे, विकास गुप्ते यांनी विशेष मेहनत घेतली.