सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे कर्करोग निदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

डिजिटल पुणे    01-05-2025 16:32:11

उरण : प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरात स्तनांचा कर्करोग, दातांचा कर्करोग व सर्वाइकल कर्करोग यांची तपासणी करण्यात आले.सदर शिबिराकरिता स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती नाईक ,दंतचिकित्सक अधिकारी डॉक्टर संतोष  झापकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे  यांनी तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला व सदर मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.सदर शिबिरात १४८ रुग्णांची तपासणी करून  त्यांना औषधोपचार देण्यात आले. शिबिरा करिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता भगत , सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सेवक/ सेविका ,गटप्रवर्तक ,आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले व शिबिर यशस्वी करण्यास मदत केली.एकंदरीत या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.


 Give Feedback



 जाहिराती