सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

परप्रांतीयांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मनसेची मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    01-05-2025 16:34:21

उरण : उरण तालुक्यात औद्योगिक क्षेत्रामुळे असंख्य परप्रांतीय गेल्या काही वर्षात रहात आहेत.त्यात अनेक पाकिस्तानी,बांगलादेशीय तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील. त्यांच्यामुळे उरण तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांना धोका होऊ शकतो,जागतिक प्रकल्पा पैकी ओ.एन. जी.सी, जे.एन.पी. टी,तसेच जी टी पीएस,बी.पी.सी.एल असे महत्वाचे प्रकल्प उरण तालुक्यात आहेत तसेच जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत आहे. त्या अनुषंगाने अशा लोकांची लवकर चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा अनर्थ घडेल यात मात्र शंका नाही.त्याकरता आपल्या पोलीस प्रशासनाकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करावे.

तसेच उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सर्व नवीन लोकांची माहिती घेण्यातयावी. ग्रामपंचायती कडून कोणतीही परवानगी देताना योग्य ती चौकशी करावी.स्थानिक घरमालकांनी आपलं घर भाड्याने देताना योग्य ती चौकशी करून त्याची माहितीपोलीस स्टेशनला देण्यासंबंधी सूचना करण्यात यावी.आपणाकडून लवकरात लवकर या विषयाबाबत कारवाई व्हावी अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना दिले आहे.यावेळी मनसेच्या महिला तालुका अध्यक्षा कविता राकेश म्हात्रे,शहर अध्यक्षा सुप्रिया राजेश सरफरे , मनसेच्या नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष तथा मनसेचे शहर सचिव दिनेश हळदणकर,उपविभाग अध्यक्ष अमर ठाकूर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती