जळगाव : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये वादळी पाऊस व गारपीटमुळे घरांच्या पत्र्यांचे तसेच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.याबाबत तातडीने नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. दि.७ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी, अपर जिल्हाधिकारी श्री.अंकुश पिनाटे, संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन वास्तविक परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थ, शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधण्यात आला. पंचनाम्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.