नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर आता भीषण हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला केला आहे. मात्र आता पाकिस्तानची अडचण वाढली आहे. कारण भारताने हल्ला केल्यानंतर बलोच आर्मीने देखील पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची दुहेरी संकट ओढवले आहे.
पाकिस्तानने आज दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.
भारताने एका बाजूने काउंटर अटॅक केला असतानाच पाकिस्तानमध्ये बलोच आर्मीने देखील पाकिस्तानच्या सैन्य दलांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला नक्की कोणाचा सामना करायचं हे समजत नाहीये. पाकिस्तानने त्यांच्या आर्मी चीफ असीम मुनिरला देखील अटक केल्याचे समजते आहे. बलोच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ले चढवले आहेत.
पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानीवर देखील भारताने हल्ला केला आहे. तर भारतीय नौदललाने आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर मोठा हल्ला केला आहे.
भारत पाकिस्तान युद्ध सुरु
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानने भारतावर मिसाईन आणि ड्रोन अटॅक सुरु केला आणि त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्यर दिले आहे. भारताच्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली मात्र भारताने प्रतित्युत्यर दिल्यानंतर आता भारताने लाहोरमध्ये कारवाई केली आहे. भारताने चार विमान नेस्तनाबूत केली आहे अशी माहिती समोर आली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळे हादरल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु होताच भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक निर्णय घेतले जात आहेत. राजधानी दिल्लीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमधील इंडिया गेट रिकामे करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच इंडिया गेटचा सर्व परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना इंडिया गेटपासून लांब जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इंडिया गेटच्या बाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील आठ आश्चर्यापैकी एक असलेले आणि भारताच्या पर्यटनातील महत्त्वपूर्ण वास्तू असलेले ताजमहाल देखील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ताजमहालच्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या 1971 च्या युद्धावेळी देखील ताजमहाल झाकून ठेवण्यात आला होता. यावेळी देखील ताजमहालची सुरक्षा वाढवली आहे.
भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी
पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला असून सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या आयएनएस विक्रांत कडून हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या शहरांमध्ये भारताच्या वायू दलाने हल्ला केला आहे. पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयावर देखील भारताने हल्ला केला आहे.