सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही...

डिजिटल पुणे    09-05-2025 11:40:45

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्थिरतेचं चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिक आणि सत्ताधारी वर्गामध्ये असा विश्वास आहे की, असीम मुनीरच्या एकहाती निर्णयशक्ती आणि आक्रमक धोरणांमुळेच पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटला चालवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी मोठं वक्तव्य केलंय.  

 

पाकिस्तानमध्ये असीम मुनीर संदर्भात जे काही घडतंय ते अत्यंत महत्त्वाचे असून दाट शक्यता आहे की त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येईल, असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि आयएसआय मधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते, असेही अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.  

 

पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या अनेक शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्कारांनी त्यांना हवेतून परतवून लावले. भारताकडून पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर येथे हल्ले केले गेले, तर कराची बंदरावरही हल्ले चढवले. यावेळी या हल्ल्यातील एक बॉम्ब पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर पडला आहे तर पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांच्या घराशेजारी स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

 

जानेवारी २०२३ मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून २०२४ मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर हल्ला, ऑक्टोबर २०२४ मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला, या सगळ्या दहशतवादी कारवायांमागे मुनीर मास्टरमाईंड होते. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही. तर एक कॉर्पोरेट नेताही आहे. 

 

पाकिस्तानमधील घडामोडी पाहता शक्यता आहे की, पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीरला जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवलं जाईल. असीम मुनीरला सर्व गोष्टीसाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य नामनिराळा होईल, असा अंदाज कर्नल पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. 

 

 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवले आहेत. विशेषतः एस-400 एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हा हल्ला निष्फळ ठरला. पाकिस्तानकडून भारताच्या 15 शहरांवर करण्यात आलेला हवाई हल्ला एस-400 प्रणालीने उलथवून लावला. काल रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानातून आलेल्या क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनचा यशस्वी पद्धतीने नायनाट केला. यामध्ये भारताच्या ‘सुदर्शन चक्र’ नावाच्या एअर डिफेन्स युनिटने निर्णायक भूमिका बजावली. भारतीय संरक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार, एस-400 प्रणालीने पाकिस्तानकडून आलेली सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच उडवून लावले. 


 Give Feedback



 जाहिराती