पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन निकाल जारी केले जातील.
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल. results.digilocker.gov.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org यासह अन्य माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही निकाल जाणून घेऊ शकता.
‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल :
आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार असून, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट संकेतस्थळांवर दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश मिळेल. शालेय जीवनाचा पहिला मोठा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
SSC Result | पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया :
जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका वाटत असेल, तर उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज निकालानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीनं व निर्धारित शुल्कासह सादर करावा लागेल.
आजच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरणार असून, करिअरच्या दृष्टीने देखील हा टप्पा निर्णायक ठरणार आहे. योग्य नियोजन, करिअर मार्गदर्शन आणि मानसिक स्थैर्य राखत पुढील टप्प्यांकडे वाटचाल करावी, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.