पुणे :गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मात्र आता देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागरिकांसाठी एकदिलासादायक बातमी समोर आली आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
अंदमान निकोबार बेटांवर गेल्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे समोर येत आहे. बंगालचा उपसागर उत्तर अंदमानचा समुद्र, निकोबर बेट या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव दक्षिण बंगालचा उपसगरचा काही भाग मान्सून दाखल होण्यास चांगला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे.येत्या 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून 6 जून आसपास येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज पुणे आणि अन्य शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान महाराष्ट्रासाठी देखील एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकरच येण्याची शक्यता आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली.नाशिक महानगरपालिकेकडून पावसाळापूर्वीचे नालेसफाई आणि भूमिगत गटाऱ्यांची साफसफाई न केल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे तर रामकुंड गोदावरी परिसरातील गटारीचे ढापे पूर्णतः बंद झाल्याने गटारीचे पाणी थेट गोदापात्रात मिसळत आहे. मात्र, आज नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने रामकुंड परिसरात पावसाने वाहून आलेला कचरा आणि ढाप्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच बीड, जालना या परिसरात देखील अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, या पावसाचा शेती पिकांना पटका बसत आहे.