सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली,ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली

डिजिटल पुणे    13-05-2025 15:50:58

आदमपूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलं. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. काल नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि शूर जवानांची भेट घेतली.आज सकाळी कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी हे एअरबेसवर दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. आदमपूर येथे भारताचे मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या शूर जवानांचे कौतुक केले आहे. 

अखेर पाकिस्तानने मान्य केलंच…

युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे.

पंतप्रधान यांनी X वर लिहिले- 'आज सकाळी मी एअर फोर्स स्टेशन आदमपूरला गेलो आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो.' धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी सर्वस्व देणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे भारत नेहमीच आभारी आहे.सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तिन्ही सैन्याच्या सैनिकांचे कौतुक केले होते.

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले.

युद्धबंदीच्या ५१ तासांनंतर पंतप्रधानांनी २२ मिनिटांचे भाषण दिले पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर ५१ तासांनी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी, दहशतवाद, सिंधू पाणी करार आणि पीओके यावर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले होते की, ज्या दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले होते, त्यांचा आम्ही नाश केला आहे. आमच्या कारवाईत १०० हून अधिक भयानक दहशतवादी मारले गेले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती