सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं;अटारी बॉर्डरवरुन पी के शॉ परतले!

डिजिटल पुणे    14-05-2025 12:48:25

अमृतसर: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ  यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याठिकाणी पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ   पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने त्यांना 23 एप्रिल रोजी पकडले होते. मात्र, आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले.

सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. 14 मे ला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पाकिस्तानने त्यांना सुरक्षितपणे भारताच्या स्वाधीन केले. हे प्रत्यार्पण अमृतसरमधील अटारी येथील संयुक्त चेकपोस्टद्वारे शांततेत पूर्ण झाले. जवान पूर्णम कुमार शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसले होते. यानंतर पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले. या घटनेबाबत भारताने तातडीने पाकिस्तानशी उच्चस्तरीय चर्चा सुरू केली आणि सैनिकाच्या सुरक्षित परतीची मागणी केली.

सीमा सुरक्षा दल पंजाब फ्रंटियरने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना आज सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा संयुक्त चेकपोस्टवरून पाकिस्तान रेंजर्सनी भारताच्या स्वाधीन केले. हे हस्तांतरण शांततेत आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार पार पडले.” यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

त्यांची पत्नी रजनी शॉ गर्भवती आहे. ती तिच्या पतीला पाकिस्तानच्या कैदेतून सोडण्यासाठी विविध पातळ्यांवर विनवणी करत होती. शेवटी भारत सरकारने राजनैतिक मार्गांनी पाकिस्तानवर दबाव आणला आणि शेवटी पाकिस्तानला तेथून निघून जावे लागले. रजनी फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या कमांडिंग ऑफिसरला भेटली होती. बीएसएफ अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर, ती तिच्या मुलासह, बहिणींसह आणि मेहुण्यांसह अमृतसरमार्गे कोलकात्याला परतली.

२३ एप्रिल रोजी चुकून सीमा ओलांडली

पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात असलेले पूर्णम कुमार शॉ यांनी २३ एप्रिल रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि नंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ  यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ  ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती.

पंजाबमधील फिरोजपूरजवळील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडल्यानंतर बीएसएफ जवानाला २३ एप्रिल रोजी पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. सुरुवातीच्या अहवालांनुसार, सैनिक चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसला होता. बीएसएफने आपल्या जवानांना सीमेवर गस्त घालताना सतर्क आणि सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले होते. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ  यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ  यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ  यांची सुटका होऊ शकली नव्हती.

 


 Give Feedback



 जाहिराती