पुणे : पावसाळा तोंडावरती आला तरीसुद्धा पालिकेने कुठलीही नालेसफाई अद्याप कामे चालू केलेली नाही. सदर 34 गावांमध्ये नालेसफाई ड्रेनेज लाईन चा मोठा विषय असून पालिकेचे कामकाज हे राम भरोसे चालू असल्यामुळे आत्ता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या संदर्भात आदेश पारित केले असून तातडीने निवडणूक घेतल्यानंतर नागरिकांची कामे होण्यास अधिक मदत होईल परंतु निवडणुका जसे जसे लाबणीवरती जात आहे. तस तसे नागरिकांच्या समस्या ह्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
अधिकारी कोणालाही जुमानण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांचा आवाज उचलणार तरी कोण असा प्रश्न उद्भवला आहे. याचंच उदाहरण म्हणून आत्ताच झालेल्या आवकळी पावसामुळे नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात घुसले आंबेगाव खुर्द सच्चाई माता परिसर अटल 12 या ठिकाणी छोट्या पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवत असेल तर मोठा पाऊस आला तर काय होईल. नागरिकांना त्याच ठिकाणाहून स्थलांतरित करण्याची वेळ ही प्रशासनावरती ओढवली जाणार आहे. तातडीने नालासफाई ड्रेनेज लाईन सर्व कामे तातडीने या भागांमधून पूर्ण केली पाहिजे, असे वक्तव्य आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी व्यक्त केले. पुणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे आपल्याला दिसून आले. सरकार पालिका बजेट आखते परंतु ते बजेट कोणाच्या खिशात जातं बजेटनुसार नागरिकांची कामे झाले पाहिजे ते होताना मात्र दिसत नाही. असा आरोप आप कडून करण्यात येतोय.