पुणे : कात्रज येथे शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा २०२५ मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला.आकर्षक विद्युत रोषणाईने दिमाखदार सोहळ्यात शिवसेनेचे उपनेते पुरंदर-हवेलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते मूर्ती पूजन होऊन आरती करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक सुरेशभाऊ कदम, मा. नगरसेवक वसंत मोरे, मा. नगरसेवक प्रकाश कदम, प्रभाकर कदम,युवा शेतकरी संघ अध्यक्ष रोहिदास बाप्पू चोरघे, शरद पिलाने, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम, मा. स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, श्वेतांगदादा निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते विकासनाना फाटे, राजू आप्पा लाटमे, अखिल नायर, शिवम कदम, सोहम कदम, रोशन गोफणे, भाग्यजीत जाधव, रमेश पवार, अक्षय दिक्षीत यांच्या सह असंख्य कार्यकर्ते व शिवशंभू भक्त उपस्थित होते. कात्रज देवस्थान ट्रस्ट व शिवशंभू प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश सुरेशराव कदम यांनी या सोहळ्याचे आयोजन केले.