मुंबई : पुणे आयसीस मोड्यूल प्रकरणात एनआयएकडून दोघांना अटक केली आहे. पुणे आयसीस मॉड्युल प्रकरणी एनआयएने दोन आरोपींना इंडोनेशीतून अटक करुन भारतात आणण्यात यश मिळवलं आहे. तल्लाह लियाकत खान आणि अब्दुल फैय्याज शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. पुण्यातील कोंढवा भागात इसीसचे मॉड्युल एनआयएने छापा टाकून उद्ध्वस्त केलं होतं. मात्र हे दोघे इंडोनेशियाला पळून गेले होते. भारताच्या परराष्ट्र विभागाने याची माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डीपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशियाने घेतला. त्यानंतर एनआयएने दोघांना मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
अब्दुलाह शेख आणि तल्लाह खान या दोन फरार आरोपींना एनआयए कडून करण्यात अटक आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली. इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी एनआयएची माहिती आहे. दोन वर्षापासून पुण्याच्या आयएसआय मॉड्यूल प्रकरणात दोन्ही आरोपी फरार होते. दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यास तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जकार्ताहून आलेल्या विमानातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालंय. त्यानंतर टी-2 वरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना या दोघांची ओळख पटताच त्यांना तातडीनं ताब्यात घेऊन एनआयएच्या हवाली करण्यात आलंय. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. या दोघांविरोधात एनआयए कोर्टानं अजामीनपात्र वॉरंटही जारी केलेलं होतं.
काय आहे प्रकरण?
वर्ष 2023 मध्ये पुण्यात समोर आलेल्या आयसीस मॉड्यूलमध्ये या दोघांची नावं समोर आली होती. अब्दुल्ला फैज शेखनं पुण्यातील कोंढवा भागात एक फ्लॅट भाड्यानं घेत तिथं स्फोटकांबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा घेण्याची योजना राबवली होती. याप्रकरणी एनआएनं 10 जणांना आरोपी करत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. ज्यात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादीर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामिल नाचन, अकिफ नाचन आणि शहनवाज आलम या दोघांना अटक करण्यात आली असून, अब्दुल्ला आणि तल्हा या दोघांना फरार आरोपी दाखवण्यात आलं होतं. या सर्वांवर यूएपीए, स्फोटकं कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि बीएनएस मधील इतर कलमांनुसार आरोप लावण्यात आलेत.