उत्तराखंड : केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग करताना दिसले. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या वैद्यकीय सेवेसाठी वापरले जात होते. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे अपघातासारखे दृश्य निर्माण झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एम्स ऋषिकेशचे हेलिकॉप्टरला केदारनाथ क्रॅश लॅंडींग करायला लागले. हेलिकॉप्टरच्या मागील भागात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर, एक पायलट आणि आणि एक रूग्णालायचा सदस्य प्रवास करत होते. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीनही प्रवासी सुखरूप आहेत.गढवाल कमिशनर विनय पांडे यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर योग्य रीतीने लँड झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक हेलिकॉप्टर लँड करण्यामागे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टळली आहे.
केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झालाय, हेलिकॉप्टर मधील सर्व प्रवासी हे सुरक्षित असल्याचे कळतय. हेली अम्बुलन्सचा केदारनाथ हेलीपॅड वरती हा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरच नुकसान झालेल आहे. सुदैवाने यामध्ये प्रवासी सगळे सुरक्षित असल्याची माहिती मिळतीय.यामध्ये कोणीही जखमी झालेल नसल तरी हेलिकॉप्टरच चांगलच नुकसान झालेल आहे. ब्रेकिंग बातमी आपण बघतोय केदारनाथ मधली ही दृश्य काहीशी आता समोरी. त्यांचा जीव वाचलेला आहे आणि त्या हेलिकॉप्टर मध्ये जेवढे सर्व प्रवासी होते ते देखील सुरक्षित आहेत पायलट देखील सुरक्षित परंतु क्रशिंग झालेल आहे.
पायलटने घेतलेला त्वरित निर्णय आणि दाखवलेले प्रसंगावधान यामुळे मोठा अनर्थ टळला. रुद्रप्रयाग जिल्ह्याचे पर्यटन अधिकारी संदीप कुमार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “पायलटच्या हुशारीमुळे गंभीर दुर्घटना टळली असून यासाठी त्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.” दरम्यान, केदारनाथ धाम यात्रा नुकतीच सुरू झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी केदारनाथ धामात हजेरी लावली. अशा वेळी झालेल्या या क्रॅश लँडिंगमुळे थोडा काळजीचा क्षण निर्माण झाला असला, तरी ही घटना सुदैवाने धोक्याच्या पातळीवर गेली नाही.