दौंड : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं पुण्याच्या दौंडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कुरकुंभ (ता. दौंड) मधून साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे
कुरकुंभ मधील भागवतवस्ती मधील किराणा दुकानासमोरून आरोपीने पीडित साडे पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून त्या मुलीला मळदमधील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. स्थानिकांनी मुलीचा आरडा-ओरड करत असलेला आवाज ऐकल्याने घटनास्थळी जाऊन भयानक प्रकार उघडकीस आला. 27 वर्षीय नवनाथ रिठे असे नराधम आरोपीचे नाव असून दौंड पोलिसांनी या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेप्रकरणी फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी, 16 मे 2025) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोर उभी असताना आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे (27 वर्ष) याने तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण केली तसेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. स्थानिकांनी मुलीचा आरडा-ओरड करत असलेला आवाज ऐकल्याने घटनास्थळी जाऊन भयानक प्रकार उघडकीस आला. 27 वर्षीय नवनाथ रिठे असे नराधम आरोपीचे नाव असून दौंड पोलिसांनी या नराधमाला अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नराधम आरोपीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
यावेळी स्थानिक नागरिकांना मुलीचा आरडा ओरड करत असलेला आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन पुढील भयानक प्रकार रोखला. नराधम आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे (शेरेचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी वेळीच नराधमाला पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक मीरा मटाले करीत आहेत.