पुणे : टाटा ग्रुप, नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं पुणे शहरात टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या (सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्यूबेशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT) भूमिपूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यामध्ये एकूण ९ कोर्सेस टाटा उपलब्ध करून देत आहेत. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ७ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या सहकार्याबद्दल मी टाटा ग्रुपचे पुन्हा आभार मानतो. येत्या काळात महाराष्ट्रात आणखी नऊ ठिकाणी हे केंद्र उभारण्यात येणार आहेत.