सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 DIGITAL PUNE NEWS

मुंब्रा येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; ६३.९८ लाखाचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    17-05-2025 17:37:39

मुंबई : ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतुकीवर अमित गार्डनजवळ, मुंब्रा रोड, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे १६ मे २०२५ रोजी कारवाई केली. टेम्पो क्र. एम एच ०५ एएम १२६५ या वाहनावर संशय आल्याने वाहनावर छापा घालून गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याच्या (गोवा राज्यात निर्मित) एकूण ८०० बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहे. या कारवाईमध्ये वाहनासह एकूण ६३ लाख ९८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे जुल्फेकार ताजअली चौधरी (वाहनचालक) यास अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख आयुक्त, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक वैद्य, श्री.पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी.धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर.महाले, आर.के.लब्दे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी.थोरात, जवान पी.ए.महाजन, श्रीमती एस.एस.यादव, एम.जी.शेख आदींचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास अधिक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी हे करीत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती