सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

: हगवणे पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी;कोर्टाबाहेर भाजपच्या महिला आक्रमक

डिजिटल पुणे    23-05-2025 18:12:02

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अखेर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं होते. यावेळी, न्यायालयाने  28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे, बहीण करिष्मा हगवणे यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, मयत वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर व्रण आहेत. यापूर्वी अटक केलेल्या आरोपी आणि राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची एकत्रित चौकशी करणे बाकी आहे. - वैष्णवी यांना स्त्री धन म्हणून मिळालेल्या सोने तारण ठेवून घेतलेल्या पैशांचे नक्की काय केले? असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला आहे. 

या अटकेनंतर आता भारतीय जनता पार्टी शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केले आहे. तत्पूर्वीच, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. यावेळी, महिलांनी आक्रम होत ज्या गाडीतून हगवणे पिता-पुत्रास कोर्टात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

भाजप महिला आघाडीने हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात हगवणेंच्या बॅनरला चप्पलने मारहाण करत कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. दरम्यान,भाजप महिला आघाडीच्या आंदोलनाची माहिती मिळताच कोर्टासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणण्यात आले असून त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मेपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 


 Give Feedback



 जाहिराती