सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

विवाहित महिलेसोबत गुपचूप लग्न, शारीरिक संबंध आणि नंतर धोका; संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप

डिजिटल पुणे    27-05-2025 14:16:41

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सध्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून खळबळजक आरोप करण्यात आले आहेत. या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सिद्धांत शिरसाटबाबत मोठा खुलासा

या प्रकरणात, सिद्धांत शिरसाट यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत महिलेवर लग्नासाठी दबाव टाकला, असा आरोप करण्यात आला आहे. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी माझं आयुष्य संपवेन,” असा धोशा सिद्धांत शिरसाट यांनी महिलेच्या मागे लावला होता. त्यांच्या या भावनिक ब्लॅकमेलिंगमुळे महिलेने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. चेंबूर येथील एका फ्लॅटवरच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. यानंतर सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला. अखेर सदर विवाहित महिलेने सिद्धांत याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन लग्न केलं. मात्र लग्नानंतर सिद्धांतचे वर्तन बदललं.

सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. तसेच तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करेन” अशा धमक्याही दिल्या. यानंतर संबंधित महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावून सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली होती. मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सिद्धांतशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला. त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर येथील घरी नेण्यास नकार दिला आणि चेंबूरमधील घरात राहण्यास भाग पाडले. यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध  उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. “पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करुन टाकेन” अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलेने म्हटलं आहे. 

संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय. सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत ठोंबर यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. 

या गंभीर प्रकरणातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सिद्धांत शिरसाट यांनी फोन करून त्रास दिल्यास कुटुंबाला गुंडांकडून संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, असा दावा सिद्धांतने केल्याचा आरोप महिलेचा आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

सिद्धांत शिरसाट यांनी फोन करू नकोस, नाहीतर मी तुझे सर्व कुटूंब गुंडाकडून खत्म करीन. माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री शिंदे याचे उजवे हात आहेत, असंही म्हटल्याचं समोर आलं आहे. 


 Give Feedback



 जाहिराती