सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्यासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार... खासगी बस सेवा केली सुरु

डिजिटल पुणे    02-06-2025 15:54:22

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे नागरिकांच्या सुखसुविधांकडे आवर्जून लक्ष देत असतात. नागरिकांना एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवत असेल किंवा आर्थिक परिस्थितीमुळे महत्वपूर्ण गोष्टींसाठी तडजोड करावी लागत असेल तर चंद्रकांत पाटील हे तत्परतेने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करतात. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रवासात मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत माहिती घेत लगेच  ही अडचण दूर करण्यासाठी एक खासगी बस उपलब्ध करुन दिली आहे. या बस सेवेचे लोकार्पण रविवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. 

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावातील मुली शिक्षणासाठी कर्वेनगर, एसएनडीटी आदी ठिकाणी येत असतात. या भागातील बऱ्याच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अनेक कुटुंबे शेती व दुग्ध व्यवसाय करुन पोट भरतात. तसेच मुली घरी आणि शेतामध्ये आई-वडिलांना कामामध्ये मदत करुन शिक्षण पूर्ण करतात. हे करताना त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. शहरात जाण्यासाठी बस येईल त्या ठिकाणी पायी चालत जावे लागते. ग्रामीण भागातील मुलींना बस खर्चाला पैसेसुद्धा मिळत नाहीत. या मुलींची ही अडचण दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी एक खासगी बस उपलब्ध करुन दिली असून, तालुक्याच्या दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला असलयाचे ते म्हणाले. यावेळी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. या बससेवेचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खारवडे ग्रामस्थ आणि विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


 Give Feedback



 जाहिराती