अहमदाबाद : रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावत तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ आरसीबीच्या संघानं संपवला. अठरा वर्षांत पहिल्यांदाच आरसीबीनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर, आरसीबीच्या विरोधात मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सचं स्वप्न मात्र भंगलं. पंजाब किंग्सची मालकीण बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीति झिंटा आहे. पहिल्याच सामन्यापासून पंजाब धुवांधार खेळी खेळत असल्याचं पाहायला मिळालं होतं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ चं जेतेपद जिंकलं. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आरसीबीचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. तर, आरसीबीच्या विरोधात मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सचं स्वप्न मात्र भंगलं. पराभवानंतर डिंपल गर्ल प्रीति झिंटाला हुंदका अनावर झाला. या भावुक क्षणांचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
यंदाच्या सीझनमध्ये जेवढी चर्चा पंजाबच्या संघाची झाली, तेवढीच चर्चा संघाची मालकीण प्रीति झिंटाचीही झाली. तिच्या गालावरच्या खळीवर फक्त पंजाबचेच नाहीतर इतर संघांचे चाहतेही फिदा झालेले. मैदानातील प्रीतिचा वावर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. पण, संपूर्ण सीझनभर आपल्या हसऱ्या चेहऱ्यानं वावरणारी प्रीति संघानं सामना गमावल्यावर मात्र, हमसून हमसून रडताना दिसली. प्रीतिच्या डोळ्यांतलं पाणी पाहून चाहते भावूक झालेच, पण नेटकऱ्यांना फार वाईट वाटलं. अनेकांनी कमेंट करत प्रीतिला न रडण्याची गळ घातली आहे. तर, अनेकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने 11 वर्षांनी अंतिम फेरी गाठली. परंतु अखेरच्या क्षण पराभवाला सामोर जावं लागलं. या पराभवानंतर संपूर्ण सीझनभर आनंदाने वावरणारी पंजाब किंग्सची मालकीण म्हणजेच डिंपल गर्ल हमसून हमसून रडताना दिसली. प्रीतिच्या डोळ्यांतलं पाणी पाहून चाहतेदेखील भावूक झाले.
अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी पाहताच युजर्सनीदेखील भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आम्ही तुला रडताना पाहू शकत नाही. ,'जर तू सुद्धा प्रेमानंद महाराजांना भेट दिली असती तर तुम्ही जिंकला असता.' असा सल्लादेखील काही युजर्सनी अभिनेत्रीला दिला आहे.
सध्या सोशल मीडियावर प्रीति झिंटाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संघाच्या पराभवानंतर अभिनेत्री खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रीतिला भावूक झाल्याचं पाहून तिचे चाहतेही फार दुःखी झाले. त्यांनी इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरनं लिहिलंय की, आम्ही तुम्हाला रडताना पाहू शकत नाही. दुसऱ्या एका युजरनं विराट-अनुष्कावर टीका करत प्रीतिला सल्ला दिलाय की, 'जर तू सुद्धा प्रेमानंद महाराजांना भेट दिली असती तर तुम्ही जिंकला असता.', तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, 'असं दिसतंय की, पंजाब नाही, प्रीति झिंटाची टीम पराभूत झाली आहे.'
प्रीति झिंटाचा आयपीएल संघ पंजाब किंग्ज नं दुसऱ्यांदा अनेक संघांवर मात करत फायनलमध्ये आपली जागा बनवली होती. पण, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. अशातच फक्त पंजाब किंग्ज चे खेळाडू आणि प्रीति झिंटाच नाहीतर पंजाब किंग्सचे खेळाडूही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येकजण संघाच्या पराभवावर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.