सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 शहर

नेरळपासून माथेरानची ‘क्वीन’ टॉय ट्रेन सेवा १५ ऑक्टोबर पर्यंत स्थगित; पर्यटकांसाठी पर्यायी प्रवासाच्या सुविधा उपलब्ध

अजिंक्य स्वामी    04-06-2025 14:45:39

नेरल, पुणे – नेरल ते माथेरान दरम्यान धावणारी ऐतिहासिक टॉय ट्रेन, म्हणजेच‘माथेरानची क्वीन’, ही सेवा १ जून २०२५ पासून तब्बल सुमारे चार महिने बंद राहणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळी भूस्खलन आणि सुरक्षा कारणास्तव ही सेवा १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे अमन लॉज ते वॉटर पाइप स्थानकादरम्यान भूस्खलन झाल्याचे निष्पन्न झाले असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही टॉय ट्रेन सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

पर्यायी प्रवास व्यवस्था:

टॉय ट्रेनची मुख्य सेवा बंद असली तरी, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची टॉय ट्रेनची शटल सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांना माथेरानपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे.तसेच, मालवाहतूक सेवा दररोज सकाळी ८:२० वाजता नेरल स्थानकावरून सुरू होईल. शनिवार आणि रविवार वगळता ही सेवा नियमितपणे उपलब्ध राहील. मालगाडी सूर्यास्तापूर्वी परत येणार आहे.

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना:

सेवा बंद असलेल्या कालावधीत पर्यटकांनी नेरलहून वाहनाने अमन लॉजपर्यंत प्रवास करावा लागेल. त्यानंतर माथेरान हे वाहनमुक्त क्षेत्र असल्याने, पायी चालत, घोड्याने, अमन लॉज पासून टॉय ट्रेनने किंवा हातगाडीने प्रवास करावा.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरनंतर मार्गाची तपासणी आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच टॉय ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली जाईल. पर्यटकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती