पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात तरूणांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यातील हिंजवडी परिसरात आयटी इंजिनिअरने चिठ्ठी लिहून 21 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबीरे ( (25, रा. हिंजवडी) असे नाव आहे. अभिलाषा ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. 31 मे रोजी पहाटे ती तिच्या मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत (द क्राऊन ग्रीन सोसायटी) दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले आहे.
चिठ्ठीत काय?
सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवाडी मधील एका २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ३१ मे च्या पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (25, रा. हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीत दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली असता लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4.42 सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरिल महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून, या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे. प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटले आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेले सुसाइट नोट सापडली आहे, त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, असं लिहिलेलं आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.
नॅपकीन, मोबाइल पोलिसांनी केले जप्त
अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला असता तिने दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु, त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु, तिचा फोन बंद होता त्यामुळे संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी तिच्या रूमची केली पाहणी असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. 'माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वतःच्या मर्जीने करत आहे.' असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.