सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 जिल्हा

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

डिजिटल पुणे    06-06-2025 16:15:49

रायगड : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.छत्रपती संभाजी राजे  आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी पार पडला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभागचे संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग व जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या.हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती