सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 जिल्हा

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    07-06-2025 10:48:48

उरण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा)  राजेंद्र तरस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध नियुक्त्या केल्या आहेत.
 
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी, युवासेना सचिव पच्शिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.त्यामध्ये युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी-चिंचवड) राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे,युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष (भोसरी – खेड विधानसभा) अजिंक्य उबाळे, युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा सागर पाचार्णे, युवासेना मावळ तालुकाध्यक्ष राजेश वाघुले, युवासेना पिंपरी-चिंचवड उपशहराध्यक्ष सुजित कांबळे, रविंद्र शेलार, दिगंबर गुंजाळ, युवासेना भोसरी विधानसभा उपशहराध्यक्ष ऋषिकेश कुकडे, युवासेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर, युवासेना चिंचव़ड विधानसभा उपाध्यक्ष सागर शिंदे,सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपाध्यक्ष अनिरूद्ध जाधव, युवासेना विभागउपाध्यक्ष गौरव राउळ यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
 
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेची ताकद युवा संघटना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाईल. त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेले जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहचवावित. आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करित आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लोकोउपयोगी कामे केली जात आहेत. ही कामे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवावीत. सरकारच्या योजानांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.


 Give Feedback



 जाहिराती