सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 जिल्हा

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

डिजिटल पुणे    07-06-2025 10:54:23

मुंबई : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी, आणि बंधुभाव घेऊन येवो, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.आपले राज्य ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृतीचे लोक प्रेमाने आणि सौहार्दाने राहतात. 

अशा या राज्यात बकरी ईदच्या दिवशी आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावे. सण म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर सामाजिक सौहार्दाचे सशक्त माध्यम आहे. हा सण आपल्याला परस्पर प्रेम, समर्पण आणि समाजातील गरीब गरजू लोकांबद्धल सहानुभूती बाळगणे शिकवतो. बकरी ईदच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ करावे, हीच अपेक्षा आहे,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.


 Give Feedback



 जाहिराती