सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 जिल्हा

बनावट देशी दारू साठ्यावर कारवाई ; ५१.३२ लाखाचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    07-06-2025 14:06:05

मुंबई : ए. के. इलेक्ट्रीकल्स समोर, मुंब्रा-पनवेल रोड, मुंद्रा, शिळफाटा (ता. जि. ठाणे) येथे बेकायदेशीररित्या बनावट देशी दारुचा साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ५ जून रोजी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५१ लाख ३२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंब्रा-पनवेल रोड, मुंब्रा, शिळफाटा या परिसरातून गोवा राज्यातील बनावट देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या टीमने सापळा रचत चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या क्र. जीजे-०६-बीव्ही-५८२२ या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे ९० मिलीचे १२१ बॉक्स व १८० मिलीचे ७२९ बॉक्स जप्त केले. यामध्ये आरोपी लक्ष्मण सिंह नाथू सिंह राठोड, वय ३७ वर्षे, रा. बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपुर (राजस्थान) यास अटक करुन परराज्यातील बनावट देशी दारु वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या वाहनासह गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे एकूण ८५० बॉक्स, एक मोबाईल व एका वाहनासह अंदाजे किंमत ५१,३२,९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक श्री. यादव, रिंकेश दांगट, व्हि. व्हि. सकपाळ, सहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, तसेच जवान श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, अमीत सानप, कुणाल तडवी, हर्षल खरबस यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव हे पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती