सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 जिल्हा

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

डिजिटल पुणे    07-06-2025 16:49:37

रायगड  : रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री  कु. अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या शिवसृष्टीमध्ये स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, त्यातून महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि धैर्याचे दर्शन घडते. “हे किल्ले केवळ स्थापत्य नव्हे, तर स्वाभिमान, स्वतंत्रता आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन कु. तटकरे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत  तटकरे, नगरपरिषद मुख्याधिकारी अजयकुमार एडके, तसेच संतोष पोटफोडे, मधुकर पाटील, समीर शेडगे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर, महेश कोलटकर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास कु. तटकरे यांनी  व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती