पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौकात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. भर चौकात हा अपघात घडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. या दुर्घटनेत 29 वर्षीय दिपाली युवराज सोनी यांचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात कसा झाला?
सीसीटीव्ही फुटेजनुसार, MH 14 AS 8852 क्रमांकाच्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिली. स्कूटरवर दोघे प्रवास करत होते. स्कूटरवरुन दोन व्यक्ती प्रवास करत होते. अपघात एवढा भीषण होता की, दिपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी अवस्थेतील जगदीश सोनी यांना स्पायरल हॉस्पिटल, गंगाधाम चौक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदीश पन्नालाल सोनी वय (61) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर दिपाली युवराज सोनी (वय 29)असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
अपघातानंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51), राहणार भवानी पेठ, पुणे असे आहे.
या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात BNSS कलम 105 आणि आयपीसी 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान, हा अपघात कसा आणि कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.