सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
  • सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्यात पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
  • सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही
  • पुण्यातील हिंजवडी परिसरामधील एका 26 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', अशी चिठ्ठी लिहून 13व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 विश्लेषण

पुण्यात ढगफुटी! दिवेघाटात धबधब्यांचे रौद्र रुप तर आय बी गेस्ट हाऊसमध्ये पाणी, पिंपरीत चार ते पाच वाहनं वाहून गेली

डिजिटल पुणे    14-06-2025 11:16:13

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी चांगलेच झोडले. तर दिवे घाटात ढगफुटी झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पुण्यात सखल भागांत पाणी साठले आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्याचे काही व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या पावसाचा फटका काही शासकीय इमारतींनादेखील बसला. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार, सरकारी अधिकारी वास्तव्य व्यवस्था प्रभावित झाली. झालेल्या पावसामुळं  गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या जिन्यापर्यंत पाणी साठले होते. 

दिवे घाटात ढगफुटी

पुण्यातील डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे घाट परिसरात धबधबे ओसंडून वाहत होते. काही धबधब्यांनी रौद्र रुप धारण केलं होते. घाटातून मोठ्याप्रमाणा पाणी वाहत होते. 

पिंपरीत वाहने वाहून गेली

पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातही पावासाने तुफान बॅटींग केली. .पिंपरी चिंचवडमधील ओढ्यात चार ते पाच वाहनं वाहून गेली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिणामी चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील चार ते पाच वाहनं वाहत आली. अग्निशमन दलाने क्रेनच्या साह्याने ही वाहनं बाहेर काढण्यात आलीत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत जोरदार पाऊस बरसला. अवघ्या एका तासाच्या आत शहरातील अनेक भाग जलमय झाले. पवळे पूल, चिखली, ताथवडे, पुनावळे, यमुनानगर, बिजलीनगर, भोसरी, आकुर्डी आणि चिंचवड बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. चिखलीतील घरकुल भागात घरांत पाणी शिरले. तर भोसरीत एका कारवर झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वाहने पाण्यात वाहून गेली. पुण्याजवळील दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन रस्ते नाल्यांसारखे झाले होते. पावसामुळे माती, दगड आणि गोटे रस्त्यावर आले होते. त्यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, पुण्यातील महत्त्वाच्या शासकीय इमारतींपैकी असलेल्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले. जिन्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला. गेस्ट हाऊसचे कर्मचारी पाणी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. शहरात तिसऱ्या दिवशीही संध्याकाळी पावसाचा जोर कायम राहिला. आज, 14 जून रोजीसुद्धा हवामान खात्याने पुणे व परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती