सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

जखमी शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

डिजिटल पुणे    16-06-2025 14:49:06

नाशिक :अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे यांच्या घराचे पत्रे उडून झालेले नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस मंत्री भुजबळ यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाणे व ट्रॅक्टरचे वाटप

राष्ट्रीय गळीत धान्य विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग(155 क्विंटल), सोयाबीन (95 क्विंटल) बियाण्यांचे वाटप मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकरी बाळू कदम, सोमठाणा देश, असराबाई खांडेकर, नगरसुल, कानिफनाथ वारे, पाटोदा यांना राज्य कृषी पुरस्कृत यांत्रिक यांत्रिकरण योजनेतून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती