सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

डिजिटल पुणे    16-06-2025 17:25:53

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे डॉ. फिरोदिया यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.कुमारगुरू इन्स्टिट्यूशन्स, कोईम्बतूर यांनी संस्थापक तथा उद्योगपती डॉ. एन. महालिंगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, उद्योग, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सन २०१४ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.यावेळी कुमारगुरु इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष बी. के. कृष्णराज वानवरायार, उपाध्यक्ष एम. मणिकम, कार्याध्यक्ष शंकर वानवरायार, एम.बालसुब्रमण्यम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती