सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुंडमळ्याजवळील पूल कोसळला
  • २०/२५ जण वाहून गेल्याची भिती
  • पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
 क्राईम

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ‘डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या’; वाशी रुग्णालयातील अमानुष प्रकार आला समोर

डिजिटल पुणे    17-06-2025 14:11:19

नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवागृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2 हजार रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवागृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

नेमकं काय प्रकार?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपुर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती. रविवारी तिने पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यची महियी मिळताच तिचे आई- वडील उत्तर प्रदेशहुन तात्काळ नवीमुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्याची लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैश्यांची मागणी केल्याचा संतापजनक प्रक्रार समोर आला आहे.

कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो….

प्रथम कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून 1 हजार रुपये मागितले होते. मात्र, नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली. “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असे म्हणत कर्मचाऱ्यांनी थेट रोख रक्कम उकळली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जवाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या,” असं त्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

या प्रकारावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. आधी याबाबतच्या गोष्टी चर्चेत होत्या पण आता प्रत्यक्ष ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पालिका प्रशासनातील काहीजण टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे.  या प्रकरणानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जवाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या,” असं त्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवागृहामधील हा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल दोन हजार रुपये उकळल्याची ही घटना आहे. एका 23 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत असताना "कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो" असं सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्याने नातेवाईकांकडून पैसे उकळल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

नेमकं काय घडलं?

ही मृत तरुणी ही एका मोठ्या आयटी कंपनीत काम करायची. रविवारी पहाटे तिने आत्महत्या केली होती. पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या ऐरोली परिसरातील राहत्या ठिकाणी तिने आपलं जीवन संपवलं. मुळची ही तरुणी कानपूर इथं राहणारी होती.घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय नवी मुंबईत आले होते. आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन ते मुळ गावी जाणार होते. पण वाशी रुग्णालयातील शवागृहामध्ये  तिचे पालक तिचा मृतदेह घेण्यासाठी आले असता शवागृहातील कर्मचाऱ्यांनी पैशाची अधिकची मागणी करत त्यांना त्रास दिला. सुरुवातीला हजार रुपये मागितले त्यानंतर त्यांनी पुन्हा अधिक पैशांची मागणी केली, या घटनेनं संताप व्यक्त होत आहे. 


 Give Feedback



 जाहिराती