भिगवण : भिगवण ,बारामती ,इंदापुर दौंड ,कुरकुंभ रोटरी क्लब मार्फत सामाजिक बांधिलकी जपत ज्या मान्यवरांनी समाजामध्ये सामाजिक उपक्रम राबवताना लोकांना निस्वार्थीपणे मदत केली अशा विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये एकूण 12 मान्यवरांचा सन्मान रोटरीच्या मार्फत सन्मान करण्यात आला यामध्ये कोणी शाळा ,अनाथ आश्रम विविध संस्थाना रुग्णसेवा ,वारकरी सेवा ,अश्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात,अश्याच काही रत्नाचा शोध घेऊन रोटरी डिस्ट्रिक 3131 मधील रोटरी क्लब भिगवण ,बारामती ,इंदापुर दौंड ,कुरकुंभ यांनी एकत्रित येऊन डॉ .सुशीला कवड़े भोसले, डॉ . पद्मजा खरड़,बापूराव थोरात,अतुल कुलकर्णी, संतोष शेंडकर, परीक्षित गोगटे,राम डवरा, विट्ठलराव वाङ्गे ,सेझल भोईटे, प्रशांत दादा शिताप, सौ. लता नायकुडे,संजय दिवेकर, यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच मा प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बदल रोटरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत.
असा संदेश रोटरी क्लब ऑफ भिगवन चे अध्यक्ष संतोष सवाने यांनी दिला.यावेळी वसंतराव मालुंजकर, बारामती रोटरी अध्यक्ष अरविंद गरगटे,इंदापूर रोटरी अध्यक्ष मोरेश्वर कोकरे,कुरकुंभ अध्यक्ष किशोर पाटिल,दौंड सेक्रेटरी दीपक षासम,कळंबोली अध्यक्ष महेश राजपूत यांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी खुप परिश्रम घेतले. यावेळी.भिगवण रोटरी संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत,संपत बंडगर, प्रवीण वाघ,कमलेश गांधी,संजय चौधरी नामदेव कुदळे . रणजित भोंगळे, संजय खाडे कुलदीपक ननावरे,दीपाली भोंगळे, पायल भंडारी, डॉ, गणेश वनवे इत्यादि उपस्थित होते सूत्रसंचालन मोरेश्वर कोकरे यांनी केले व दीपक षासम यांनी आभार मानले.