पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,सुफी वारकरी विचार मंच,अवामी महाज,दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लि.,'झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'च्या वतीने वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक रविवार पेठ शाखा येथे २१ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर सुरु रहाणार आहे.दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लि.चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,मशकूर शेख,उमर शरीफ शेख इत्यादी संयोजन करीत आहेत.
पंढरपूर वारीनिमित्त पुण्यात सर्व धर्मीय ऐक्य दिंडी आयोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक,रिझवानी मस्जिद ट्रस्ट,सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या विद्यमाने दि.२१ जुन रोजी सर्व धर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले आहे.साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्म गुरु, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या उपाध्यक्ष 'आबेदा इनामदार,साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ)येथे समारोप होणार आहे.रिझवानी मस्जिद ट्रस्ट चे विश्वस्त अंजुम भाई,सुफी वारकरी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर अहमद शेख,सचिव उमर शरीफ शेख,आझम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.सहभागी वारकऱ्यांना शीरखुर्मा वाटप करण्यात येणार आहे.'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी 'च्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. दिंडीचे हे सहावे वर्ष आहे.