सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 विश्लेषण

माढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी चंद्रकांत कांबळे यांची निवड

गजानन मेनकुदळे    21-06-2025 11:04:39

माढा : माढा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत बाबुराव कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी जाहीर केले. 

नगरसेवक मारुती पवार यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती या पदासाठी चंद्रकांत कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.त्यांच्या अर्जावर  नगराध्यक्ष एडवोकेट मीनल साठे यांनी नामनिर्देशन पत्रावर सही केली होती. चंद्रकांत कांबळे यांची निवड झाल्याचे समजताच संपूर्ण माढा शहरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. 

चंद्रकांत कांबळे हे माढा शहर परिसरातील  प्रसिद्ध पैलवान कै. बाबुराव (आण्णा )कांबळे यांचे ते सुपुत्र आहेत ते नेहमी  गावातील इतर कुठल्याही सामाजिक  कार्यात ते  सक्रिय असतात   सर्वसामान्यांच्या अडचणी नेहमीच ते सोडवत असतात       यांनी यापूर्वी माढा तंटामुक्तीचे अध्यक्षपद म्हणूनही काम पाहिले आहे सध्या त्यांच्याकडे सन्मती   नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन देखील आहेत माढा शहरात  चर्मकार समाजाचे प्रथम नगरसेवक म्हणून त्यांनी आज इतिहास रचला आहे  या निवडीबद्दल  नगराध्यक्षा सौ मीनल ताई साठे माननीय दादासाहेब साठे उपस्थित सर्व नगरसेवक व नागरिकांनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.


 Give Feedback



 जाहिराती