मुंबई : मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नातवाने आपल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले आहे. शनिवारी सकाळी आरे कॉलनितील ढिगाऱ्यात वृद्ध महिला आढळून आली. सदर घटनेची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
यशोदा गायकवाड (वय ६०) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांना त्वचेचा कॅन्सर होता. यामुळे त्यांच्या नातवाने त्यांना मुंबई उपनगरमधील आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. यशोदा गायकवाड या मालाडमधील रहिवाशी आहेत. त्या नातावासोबत वास्तव्यास होत्या. सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी यशोदा गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या कूपर रुग्णालयात यशोदा गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच यशोदा गायकवाड यांच्या नातेवाईकांचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तातडीने घटनास्थळी पोहचत पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात, अशी माहिती त्यानी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत. यशोदा गायकवाड यांना बोलता येत नाही. त्या फक्त नातू-नातू असं सांगत आहे. त्यामुळे आरे पोलिसांना वृद्ध आजीचा कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आरे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास करत आरे पोलीस वृद्ध आजीचा कुटुंबीयांचा शोध घेत आहेत