सांगली : सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या बापानेच पोटची लेक साधना (वय १७) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले याला काल (रविवारी) अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम भोसले राहणार नेलकंजी येथे माध्यमिक विद्यालयात मुख्यध्यापक आहेत. त्यांचे वडील भगवान भोसले हे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलिस पाटील होते. पत्नी प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असी दोन मुले आहेत.
मुलगी साधना ही आटपाडीत बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होते. नुकतीच त्यासंदर्भात तिची सराव परीक्षा पार पडली. त्यामध्ये तिला कमी गुण मिळाले त्यामुळं वडील धोंडीराम संतप्त झाले आणि त्यांनी कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. या हल्ल्यात साधनाच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर तिला दवाखन्यात नेले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेमध्ये साधना गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाले होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले.
साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेलाय. याप्रकरणी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केलीये.