जुन्नर : जुन्नर तालुक्यातील औद्योगिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार आणि संस्थापक स्व. वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते! तमाम महिलांचा आदर करणारे आम्हा महिलांचे आदरास्थान, पाठीराखा मोठा बंधू!! सर्वसामान्यांची जाण असलेला अजिंक्य नेता! वक्तशीर, करारीबाणा, शिस्तप्रिय, ज्यांनी जुन्नर तालुका खर्या अर्थाने नावारूपाला आणला!
जनसेवा हाच धर्म जयाचा असलेल्या स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांना कोटी कोटी प्रणाम साहेबांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत कांदळी आयोजित उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार श्रीमती मंगलताई सचिन दाते- चेअरमन दाते इंडस्ट्री, उत्कृष्ट गुणवंत कामगार महिला पुरस्कार सौ. विद्याताई संदीप ढवळे, गुणवंत कामगार पुरूष पुरस्कार श्री जावेदभाई असलम शेख यांना प्रदान करण्यात आले व सर्व कामगारांना भेटवस्तू देण्यात आल्या...प्रसंगी तालुक्यातील सामाजिक, राजकीय, वारकरी अशा विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी साहेबांच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिला...जुन्नर तालुक्यासाठी वल्लभशेठ बेनके साहेबांचे योगदान अविस्मरणीय आहे.
