सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

पाच नव्या सायबर पोलीस ठाण्यांचा पुणे पोलिसांकडून महासंचालक कार्यालयाला प्रस्ताव

डिजिटल पुणे    26-06-2025 15:15:32

पुणे :  दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीची वाढती व्याप्ती पाहता, पुणे शहरात नव्याने पाच सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी नुकताच पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला असून, या पोलीस ठाण्यांसाठी लागणार्‍या मनुष्यबळाची देखील मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

‘शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सध्या सायबर पोलीस ठाणे आहे. सायबर पोलीस ठाण्यात दररोज किमान १०० ते १५० तक्रार अर्ज दाखल होतात. शहरातील वाढते सायबर गुन्हे, फसवणुकीचे प्रमाण विचारात घेता शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि पायाभुत सुविधा लागणार आहेत. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस टाण्यांचा समावेश पुणे पोलीस दलात करण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार, तसेच नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश विचारात घेता आणखी १६०० पाेलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असा प्रस्ताव देण्यात अलाा होता. त्यापैकी ८०० पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पुणे पोलीस दलात आणखी एक हजार पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावेत, असा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे.

पुणे पोलीस दलात सहावे परिमंडळ

पुणे पोलीस दलात सध्या पाच परिमंडळे आहेत. शहराचा विस्तार विचारात घेता आणखी एक परिमंडळाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांची रचना विचारात घेेऊन परिमंडळ सहाची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे पाोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती