सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

धक्कादायक; बीडमधील खाजगी क्लासेसच्या दोन शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण!

डिजिटल पुणे    27-06-2025 16:48:14

बीड : खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर छेडछाड आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले.  मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे.

या गुन्ह्यातील आरोपींच नाव विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या काळात सातत्याने घडला. पीडित अल्पवयीन मुलगी ही नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी बीडमधील उमाकिरण कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये जात असे. तिथे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिच्यासोबत छेडछाड करून तिचं लैंगिक शोषण केलं.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत खाटोकर याने गतवर्षी जुलै महिन्यांपासून तिच्या लैंगिक छळास सुरुवात केली. प्रशांत खाटोकर हा पीडित मुलगी वर्गातून सुटल्यावर रस्त्यावर जाऊन थांबायचा. तसेच तिला आपल्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करायचा. एवढंच नाही तर कधी कधी क्लास संपल्यावर तो या मुलीला केबिनमध्ये बोलवायचा. तसेच कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करायचा. त्यानंतर तिच्या शरीराला स्पर्श करायचा, तसंच याबाबत घरी सांगितल्यास जिवे मारेन अशी धमकी द्यायचा, असा आरोप पीडितेने केला आहे.

एवढंच नाही तर आरोपींनी आपले अश्लील फोटोही काढल्याचं पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर, पीडित मुलीने या प्रकाराबाबत दुसरा शिक्षक असलेल्या विजय पवार याला माहिती दिल्यानंतर त्यानेही तिची मदत न करता तिचं शोषण केलं. विजय पवार हा सुद्धा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. एकटीला बोलावून घ्यायचा, त्यामुळे इतर विद्यार्थीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

मला प्रशांत खाटोकर सर यांचा बॅड टच आवडत नसायचा म्हणून विजय पवार सर यांना सांगीतले तेव्हा ते मला म्हणाले की, त्यांना आम्हीच ठेवले, मुलींना त्रास देण्यासाठी. असे म्हणून ते पण माझ्यासोबत वाईट वागायला लागले व ते मला केबिनमध्ये कोणी नसताना किस करायचे माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. ते मला सर्व मुले दुसऱ्या क्लासला गेले की, बाजूला बोलवायचे व एकटीला थांबून ठेवायचे. तेव्हा सर्व क्लासमधील मुले माझ्याकडे वाईट नजरेने बघायची. ते मला आवडत नसायचे. मी ही झालेली घटना मझी मैत्रीण आर्या पिंगळे हिला सांगितरी तेव्हा ती मला म्हणाली की, ते आपले सर आहेत आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा. त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यामुळे हा झालेला प्रकार मी माझ्या आई- वडीलांना सांगितला आणि त्यानंतर आई-वडील मला तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात घेऊन आले, असे या मुलीच्या तक्रारीत म्हटले आहे.

या सर्व छळाला कंटाळून पीडित मुलगी ही मानसिक तणावाखाली गेली. मुलीच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचंही राजकीय कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती