सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर मध्ये महिला कीर्तनकाराला आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या,

डिजिटल पुणे    28-06-2025 17:11:00

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका महिला कीर्तनकाराची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ह भ प संगीताताई महाराज असे या महिला कीर्तनकाराचे नाव असून, त्यांचा मृतदेह आश्रमातच आढळून आला.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात मारेकऱ्याने आश्रमात प्रवेश करून त्यांच्यावर दगडाने हल्ला केला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. वैजापुरातील एका आश्रमात संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हत्येचे कारण अस्पष्ट

हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे. 


 Give Feedback



 जाहिराती