पुणे : महात्मा गांधी यांचा "खेड्याकडे चला"हा संदेश शिरोधार्य मानून 2019 साली पुणे सोडून कायमस्वरूपी आम्हीं गावाकडे आलो. मनात अनेक धारणा, आशा, आकांक्षा, घेऊन मी गावात स्थिरावलो. परंतु येथे आल्यावर एका गावाचे भयाण आणि सुन्न करणारे वास्तव आमच्यासमोर आले.आमचे गाव अस्मानी व सुलतानी संकटांनी त्रस्त झाले होते. अशा गावात सुख शांती तर मिळणे खुप दुर होतें. पण येथे राहणे म्हणजे एक महापाप होतें, अशी येथील लोकांची धारणा बनलेली होती.
व्यसनाधीनता, रोजगाराचा अभाव, सतत पडणारे दुष्काळ, शिक्षण व आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा, अडाणीपणा, राजकीय अनास्था, भांडणे या प्रकाराच्या विवीध अडचणी येथे आहेत, आणि यांचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम महिला व लहान मुलांवर होत आहे. यामुळे महिलांचे मानसिक, शारीरिक शोषण हे मोठ्या प्रमाणार होत आहे, बालविवाह मोठ्या प्रमाणावर होतात, महिलांना सतत बाहेरगावी मजुरीसाठी जावें लागते, यामुळे त्यांचे अजूनही शोषण वाढते. यामुळे कोणत्याही मुलीची व तीच्या आईची शेतकरी नवरा करावा, अशी मानसिकता रहात नाहीं.
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
गावातील समस्या, अडचनी, प्रश्न, सर्वाँना माहीत असतात, सर्वांना वाटत असते की प्रश्न सुटले पाहिजेत, सर्वांच्या मनात गावाविषयी प्रेम असते, परंतु सुरुवात कोण करणार याची वाट सर्वजण पाहत असतात, यातच आपले आयुष्य निघून जाते. परंतु या अडचणी दुर करण्यासाठी आपण स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे, यासाठी मी स्वतः या कामात पुढाकार घेतला...आणि सूरु झाली चळवळ समृध्द गावांसाठी......
रवळगाव हे दुष्काळी परिसरात येणारे गाव आहे. येथील सर्व रोजगार शेतीवरती अवलंबून आहे, शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, यासाठी आम्हीं वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला. माझा हा संकल्प मी मित्रांना सांगितला आणि 21 ऑक्टोबर रोजी आम्हीं चिंतामणी महादेव मंदिर परिसरात 7 वृक्ष लाऊन पर्यावरण चळवळीची सुरुवात केली. त्यानंतर त्याच परिसरात,50,100,... असे ऐकून 200 झाडें लावली. त्यावर्षी उन्हाळ्यात ती झाडें जगविण्यात यश आलें... त्यानंतर गावकऱ्यांचा प्रतिसाद वाढू लागला.
2020 साली आमचा या कामचा वेग वाढला. यावर्षी एक घर एक नांदुरकी प्रकल्प सुरू केला. प्रत्येक घरी एक झाड लाऊन देणे, हा प्रकल्प आजही सूरु आहे. गावात मोकळ्या जागी वृक्षारोपण करणे, मंदिरासमोर, शाळेत, रस्त्याच्या कडेने, असे विवीध प्रकल्प करूण वृक्षारोपण वाढविणे, लोकांनां निसर्गाविषयी जागृत करणे यासाठी विवीध सामाजिक उपक्रम आम्हीं सूरु केले.
या निसर्ग चळवळीमध्ये हळूहळू लोकांचा प्रचंड सहभाग वाढत गेला यामुळे हळूहळू काम वाढत गेले..15,000 वृक्ष लागवड चिंतामणी महादेव मंदिर परिसरात केली या कामाला आम्हीं लोकसहभागाची जोड दिली. यामुळे येथे आज भव्य नागर उद्यान प्रकल्प उभा राहिला आहे. आज या प्रकल्पात 12,000 पेक्षा जास्त झाडे जीवंत ठेवण्यात आपल्याला यश आले. आज ही झाडे 20 फूट पेक्षा जास्त मोठी झालेली आहेत. इतर विकास कामे येथे सूरु आहेत.
पर्यावरणाचे महत्त्व समाजाला कळावे यासाठी विवीध प्रकल्प सुरू केले आहेत.
1) एक घर एक नांदुरकी प्रकल्ल.
2)एक विद्याथ्री एक झाड.
3) विवाहमध्ये झाड भेट देणे.
4) प्रत्येक कार्यक्रमात झाड भेट देणे.
5) लेकीचे झाड प्रकल्प.
6) गावात आलेल्या पाहुण्यांना झाड भेट देणे.
7) आपणं जेथे पाहुणे होऊन जातो, तेथें झाड भेट देणे.
8) मुलीच्या जन्माचे स्वागत झाड देऊन करतो.
9) मृत्यू झाल्यावर आठवणीत झाड लावणे.
10) विवीध सण, उत्सव मध्ये वृक्ष वाटप.
11) एक घर एक फणस झाड लागवड.
12) एक गरीब शेतकरी 10 फळझाडे
13) विधवा, एकल महिलांना 10 फळझाडे
अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात गावात वृक्ष लागवड झाली आहे, तसेच यामधून प्रेरणा घेऊन लोकांनीं मोठ्या प्रमाणात गावात वृक्ष लागवड केली आहे.शेतकऱ्यांना आर्थिक सधन करण्यासाठी गावामध्ये कमी पाण्यात, कमी मेहनतीत, कमी मजुरीत, कमी खर्चात जास्त उत्पन्न देण्यासाठी फळबाग लागवड प्रकल्प सूरु केला. फार्मर ऑफ फॉरेस्ट या संस्थेच्या माध्यमातून विविध फळबाग,ठिबक सिंचन,झाडें जगविण्यासाठी आर्थिक मदत, कार्बन क्रेडिट चां लाभ दिला गेला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून काही फळबाग लावल्या गेल्या.
गावातील अज्ञान दुर करुन गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे. यासाठी लोकसहभाग मधून आपण ग्रंथालय सुरू केले. या माध्यमातून गावात वाचन चळवळ रुजविण्यासाठी विवीध शालेय स्पर्धा, जयंत्या, व्याख्याने, वेगवेगळी बक्षिसे, शिकवण्या सूरु आहेत. तसेच गावांतील शाळा, विद्यालय यांचा विकास, गुणवत्ता सुधारणा, करण्यासाठी आपण कार्य करत आहोत. गुणवंत मुलाना शहरांमधे चांगल्या महाविद्यालय मध्ये प्रवेश करून देने,विवीध शाखा मध्ये मुले पारंगत करणे, व्यवसायिक घडविणे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया उद्योग करून गावातच रोजगार निर्माण करणे, यामध्ये शेतकऱ्यांनी भाव चांगला मिळतो आणि रोजगारही मिळतो. यासाठी लोकांनां शेतीसाठी मार्गदर्शन, शिबिरे, आयोजीत करणे, तसेच व्यवसायामध्ये येण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण, कागदपत्रे, विक्री कौशल्य, स्टॉल मिळऊन देणे, आणि इतर सहकार्य आपण करत असतो. गावांतील उत्पादित मालावर गावातच उद्योग उभे करणे हा आपला उद्देश आहे.
शेतीमध्ये सिंहाचा वाटा हा महिलांचा असतो. परंतु ग्रामीण भागांतील महिला ही कामाच्या ओझ्याखाली दबलेली असते. गरिबी, व्यसनी नवरा, अपुरी उत्पन्नाची साधने, यामुळे कुटुंबाची व शेतीची दोन्ही जबाबदारी ही महिलांवर येते. यामुळे आपण महिला सबलीकरण करण्यासाठी कार्य करत आहोत. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, तसेच उमेद अभियान महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून महिला गट तयार करणे, त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देउन व्यवसाय साठी सहकार्य कराने. तसेच सामाजिक चळवळीत महिलांचा सहभाग वाढण्यासाठी गावात रांगोळी स्पर्धा, गौरी सजावट स्पर्धा आपण आयोजीत करत असतो. महिलांना कायमस्वरूपी रोजगार, राहणीमानात सुधारणा, आर्थिक सधनता, सुख सुविधा, सामाजिक भान देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.
गावामध्ये सततच्या मेहनतीच्या कामामुळे महिलांचा राहणीमान तसेच आरोग्य बिघडलेले असतें.. यामधे सुधरणा करण्यासाठी गावात पहिल्यांदाच ब्युटी पार्लर सूरु केले, या माध्यमातून महिलांच्या राहणीमानात सुधारणा, आरोग्यात सुधारणा, तसेच त्यांना विविध विषयात मार्गदर्शन करून त्याच्या परिस्तिथी सर्व प्रकारच्या सुधारणा करण्याचें कार्य सूरु आहे. गावांतील मुलींसाठी ब्युटी पार्लर तसेच शिवणकाम याच्या शिकवण्या सूरु आहेत, यातून त्यांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभ्या करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महिला बचत गट यांच्या माध्यमातून "नागर महिला उद्योगाची"सुरुवात गावात करण्यात आली आहे.या माध्यमातून विविध प्रकारचे लोणचे, मसाले, चटण्या व इतर घरगुती पदार्थ यांचा व्यवसाय सूरु आहे, महिलांनी रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हा उद्योग सुरू आहे.
गावातील प्रत्येक महिला बचत गट मध्ये जोडणे, त्यांना अर्थसाक्षर करणे, नियमित बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन, प्रबोधन करणे,व्यवसायामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे, आरोग्य, शिक्षण, यासाठी जण जागृती सूरु आहे....
महिला गट व्यवसायामध्ये आणण्यासाठी त्यांना मार्गदर्शन,प्रशिक्षण, कागदपत्रे, विक्री व्यवस्था, यासाठी निःशुल्क मदत केली जाते... तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद अभियान शासन यांच्या कडून व्यवसायिक साधने, स्टॉल उपलब्ध करूण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शेती फायद्याची करून उत्पन्न वाढविण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळणे ही आता काळाची गरच आहे. या शेतीसाठी गावरान गाई ही गरजेची आहे. यासाठी गावरान गाई वाचली पाहिजे, तीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजाऊन दिले पाहिजे, प्रती शेतकरी एक गावरान गाई असली पाहिजे, यासाठी आपण जण जागृती करतं आहोत. या माध्यमातुन गाईची सेवा, संशोधन सुरू आहे. आर्थिक बाजूने शेतकऱ्यांना या गाईचे महत्व पटवून देणे, सेंद्रिय शेतीसाठी गाईंचा उपयोग यासाठी आपण यावर प्रबोधन प्रचार प्रसार करत आहोत. रसायन मुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांनी गावरान गाई पाळली पाहिजे असा आपला आग्रह आहे.
कार्यमग्नता हे जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती
या विचाराने नागर चळवळ समाजासाठी अखंड कार्य रत आहे.सामाजिक चळवळींमध्ये लेखनाचे महत्व खुप असतें. समाजातील विविध गोष्टी, अज्ञान, अंधश्रधा, वाइट गोष्टी लेखनातून मांडता येतात, यातून लोकांनां ज्ञान मिळते व ते परिवर्तनासाठी तयार होतात. यासाठी सामाजिक अंगाने आपण विविध विषय, मुद्दे, यवार नेहमी लेखन करत असतो.यामध्यामातून विवीध प्रतिभावंत लेखक तयार करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे...
निसर्ग समृध्द करण्यासाठी सर्व प्रकारच्या झाडांची गरज आहे, आज अनेक झाडे, झाडांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत, काहीं होण्याच्या मार्गावर आहेत... ही झाडे वाचविण्यासाठी आम्हीं स्वतःची रोपवाटीका सूरु केली. या माध्यमातुन सर्व प्रकारच्या झाडांची रोपे बनऊन लोकांना मोफत दिली जातात किव्वा सार्वजनिक, वन विभाग यांच्या पाठोपाठ जागेत लावली जातात.. यातून सर्व प्रकारचे झाडे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गावामध्ये सर्व प्रकारच्या शासकीय योजना, उपक्रम आपण राबवत आहोत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जेवढी शासकीय लाभ लोकांना देता येतील यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.रवळगाव हे गाव सर्व सुख सुविधांनी युक्त, समृध्द, हरित, एकजूट, सधन, आधुनिक बनविण्यासाठी आपण मेहनत, संघर्ष, करत आहोत. यासाठी समाजातील विवीध संस्था, संघटना, व्यवसायिक, उद्योजक, मंडळे, महीला गट, सामाजिक गट, शाळा, महाविद्यालय यांनी एकदा रवळगाव ला भेट द्यावी आणि जमेल ते योगदान द्यावें अशी नम्र विनंती.....
2019 सालापासून आपण अविरत, अखंड मेहनत, संघर्ष करत आहोत, लोकांशी सातत्याने संवाद करत आहोत, यामुळे या गावात प्रचंड मोठे काम उभे राहिले. आज गावामध्ये 2,00,000 (2 लक्ष) अधिक झाडे जगविण्यात यश आले आहे. तसेच 500 पेक्षा अधिक महिलांचे संघटन तयार झाले आहे, अनेक मुलांना शिक्षणाच्या मूख्य प्रवाहात आणण्यात यश आले आहे, यामुळे गावाचे तापमान कमी झाले आहे, तसेच इतर गावांपेक्षा पावसाचे प्रमाण वाढले आहे, तसेच भूजल पातळीत वाढ झाली आहे. इतरही अनेक सुख सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याला यश आले आहे, यामुळे लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.
रवळगाव मध्ये आता पर्यावरण चळवळीने जोर धरला आहे, तसेच मुलांचे शिक्षण, महिलांचे प्रकल्प, आरोग्याचे काम तसेच इतर सर्व कामे वाढत आहेत, यासाठी दिवसेंदिवस निधीची गरज वाढत आहे, यामुळे निधी संकलन करण्यासाठी आम्ही शहरी भागात प्रयत्न करत आहोत, यासाठी आपण पुणे शहरात उद्योजक, कंपनी, मोठ्या सामाजिक संस्था, किंवा व्यक्तिगत देणगीदार मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत.
जागतिक पातळीवर पर्यावरणीय प्रश्न गंभीर बनत चालला आहे, यासाठी यावर मोठ्या प्रमाणात काम करणे आवश्यक आहे, यामुळे नागर फाउंडेशन दर वर्षी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने.. पर्यावरण जन जागृती रॅली काढण्यास सुरुवात केली. यामधे संपूर्ण जिल्ह्यातून अनेक संस्था, संघटना, व्यक्ती सहभाग घेत असतात. तसेच अहिल्यानगर या शहरात विविध ठिकाणी आपण हजारो झाडे लावली व त्यांचे यशस्वी संगोपन सुरू आहे.
आधुनिक काळामध्ये पर्यावरण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 2025 साली आपण 1 लक्ष झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यावर्षी महाराष्ट्रात सगळीकडे लवकर चांगला पाऊस सुरू झाला. यामुळे आपण 1 जून रोजी वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. पिंपळे गुरव, पुणे येथे आपण 1000 झाडांचा नक्षत्रवन प्रकल्प हाती घेतला आहे, या प्रकल्पासाठी झाडे आपल्याला,"ओम दत्त श्री ठाकुर महाराज सेवाकार्य ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली. आज येथे ही झाडे लाऊन झाली आहेत.
निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षण या कार्यात महिलांचा व मुलांचा वाटा नेहमी मोठा राहिलेला आहे, यामुळे रवळगाव मध्ये आपण शाळेतील सर्व मुलांना व महिलांना 500 फळझाडे वाटप केली आहेत. मागील 5 वर्षांमध्ये रवळगाव मध्ये सर्वांच्या मनात झाडाचे महत्व रुजविण्यास आपल्याला यश आले आहे, येथील मुले, महिला व माणसे आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे झाडाची काळजी घेतात. या सर्व झाडाचे आपण जियो टॅगिंग करून घेत असतो. यामुळे येथे 95% प्रमाण आहे झाडे जगण्याचे.
2025- 2026 या वर्षी आपल्याला 1,00,000(1 लक्ष) झाडे लावून त्याचे यशस्वी संगोपन करायचे आहे. यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. आपल्या सर्वांच्या चांगल्या भविष्यासाठी हे कार्य होणे ही आजच्या काळाची गरज आहे. यामुळे नागर फाउंडेशन वतीने समाजातील दानशूर संस्था, व्यक्ती, उद्योजक, संघटना व इतर सर्व घटकांना आवाहन करण्यात येत आहे की.. या कार्यात आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात, किंवा इतर कोणत्याही स्वरूपात आपण मदत करू शकता, प्रत्येकाने स्वतःला सहज शक्य होईल ती मदत करून पर्यावरण चळवळीला अधिक बळ व वेग द्यावा अशी नम्र विनंती.