सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

वीर वाजेकर महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    01-07-2025 10:41:51

उरण : ३० जून २०२५ रोजी उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना व वीर वाजेकर महाविद्यालय,यांच्या संयुक्त विध्यमाने 'कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन  करण्यात आले होते.या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.वानखेडे सह दिवाणी न्यायाधीश उरण,एम.एस.काझी प्रमुख न्यायाधिश उरण तसेच उरण न्यालयीन अंतर्गत वकील उपस्थित होते.अनुराग ठाकूर यांनी जागतिक बालमजुर दिनाच्या निमित्ताने बालमजूर आणि जागतिक स्तरावरील समस्यांचे विश्लेषण केले.बालमजूर कसे तयार होतात,त्याच वय किती असते तसेच बालमजूर कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगाराला शिक्षा कशी होते.याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याविषयी जागृती व्हावी,या विषयाची गंभीरता तरुणांच्या समजावी आशा सोप्या भाषेत अनुराग ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

अभिषेक म्हात्रे यांनी अमली पदार्थ सेवन व विक्री या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजचा तरुण अमली पदार्थ सेवणाच्या आहारी जात आहे,तसेच कमी वयाच्या मुलांकडून अमली पदार्थ विक्री अवैध पध्दतीने कशी केली जाते.यात अडकलेल्या तरुणांना कसे काढता येईल,व कायदा कशा पद्धतीने काम करतो याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.एस.काझी यांनी युनो मध्ये संबंधित कायद्या संदर्भात माहिती दिली.या प्रसंगी व्ही.एल.पाटील अध्यक्ष बार असोसिएशन उरण, उरण तालुका वकील संघटनेचे वकील, महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठाकूर,उपप्राचार्य प्रा.गजानन चव्हाण,प्रा.बळीराम पवार,प्रो.अनिल पालवे,प्रा.प्रांजल भोईर,डॉ.सुजाता पाटील,  महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती