सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या वतीने पुणे मनपा अंतर्गत येणाऱ्या १५६ (ब) मराठी शाळा, भैरवनगर येथे विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले

गजानन मेनकुदळे    02-07-2025 11:20:42

पुणे : मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना सौ. पूजाताई जाधव यांच्या हस्ते  छत्री वाटप धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या वतीने पुणे मनपा अंतर्गत येणाऱ्या १५६ (ब) मराठी शाळा, भैरवनगर येथे विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत येताना व जाताना होणाऱ्या अडचणी कमी करणे व त्यांचे आरोग्य जपणे. गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते. मराठी शाळा टिकली पाहिजे मराठी शाळेत आपली मुले शिकली पाहिजेत. 

पूजा ताई जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “माझे पती धनंजय जाधव ज्या शाळेत शिकले तेथे हा सामाजिक उपक्रम राबवत असताना अत्यंतिक आनंद होत आहे, प्रत्येकाला वाटते की आपण ज्या शाळेत शिकलो तेथे सामाजिक दायित्वतून मदत करावी परंतु आज मला पतीच्या स्वप्नांवर काम करताना आनंद होत आहे”धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन हे समाजासाठी कार्य करत असून, शिक्षण, आरोग्य व सामाजिक संवेदनशीलता यांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबवत आहे.

यावेळी गणेश दादा सोनवणे, कुणाल शिंदे, प्रणय शेंडे, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, ओमकार येनपुरे, दादाराव बोबडे, अजित बाबळसुरे, प्रज्योत राणे, राज गवळी, सार्थ जाधव उपस्थित होते.या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत येताना व जाताना होणाऱ्या अडचणी कमी करणे व त्यांचे आरोग्य जपणे. गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते. मराठी शाळा टिकली पाहिजे मराठी शाळेत आपली मुले शिकली पाहिजेत. 

पूजा ताई जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “माझे पती धनंजय जाधव ज्या शाळेत शिकले तेथे हा सामाजिक उपक्रम राबवत असताना अत्यंतिक आनंद होत आहे, प्रत्येकाला वाटते की आपण ज्या शाळेत शिकलो तेथे सामाजिक दायित्वतून मदत करावी परंतु आज मला पतीच्या स्वप्नांवर काम करताना आनंद होत आहे”धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन हे समाजासाठी कार्य करत असून, शिक्षण, आरोग्य व सामाजिक संवेदनशीलता यांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबवत आहे.यावेळी गणेश दादा सोनवणे, कुणाल शिंदे, प्रणय शेंडे, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, ओमकार येनपुरे, दादाराव बोबडे, अजित बाबळसुरे, प्रज्योत राणे, राज गवळी, सार्थ जाधव उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती