सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, पुण्यात मनसे आक्रमक!

डिजिटल पुणे    03-07-2025 14:39:25

पुणे : पुण्यात राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण यांनी राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केदार सोमण यांना 'सोप' देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मनसे कार्यकर्ते आणि केदार सोमण यांच्यात मध्यस्थी केली. मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले की, "जर तुम्ही या पोलिसांनी सोमणवर कारवाई केली तर आम्ही याला सोप देणार नाही." पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये समजूत झाल्यानंतर केदार सोमण यांना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना पुण्यातील वनाज भागात घडली असून, राज ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावावर पोलीस नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

केदार सोमण या युवकाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधाात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून जोरदार मारहाण केली.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत केदार सोमणला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.

केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागात राहतो. राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरून सोमणने ही पोस्ट शेअर केली होती. फेसबूक पोस्ट समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना सोमणचं घर गाठलं. मनसे कार्यकर्त्यांनी घरात दरवाजा ठोठावला मात्र केदार सोमणने दरवाजा उघडलाच नाही. मनसे सैनिकांनी सोमण याला शिवीगाळ करत बाहेर येण्यास सांगितले. मात्र सोमण बाहेर आला नाही.  अखरे मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पुणे पोलिसांना केदार सोमण याला ताब्यात घेतला आहे. 

"आम्ही त्याला फटके द्यायला इथे ओला होतो. मात्र आता पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. केदार सोमणने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्याविरोधात ही पोस्ट लिहिली आहे. याचा अर्थ कुणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, हो दोन नावे घेणे म्हणजे कुठल्यातरी पक्षाच्या नेत्याने त्याला यासाठी तयार केले आहे. पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं आहे, मात्र मनसे कार्यकर्ते त्याला सोडणार नाहीत", असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

मनसे कार्यकर्ते केदार सोमणच्या ज्या फेसबुक पोस्टवरुन आक्रमक झाले ती पोस्ट देखील त्याने अद्याप डिलिट केलेली नाही. केदार सोमणने हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन मागील काही दिवसात बऱ्याच पोस्ट फेसबूकवर टाकल्या होत्या. विशेष म्हणजे मनसे कार्यकर्तो घराबाहेर राडा घालत असताना देखील केदास सोमण फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

 


 Give Feedback



 जाहिराती