पुणे :सिंहगड रस्त्यावरील फन टाईम टॉकीजजवळील पथविक्रेत्यांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर- जिल्हाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर- जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महापालिका अधिकारी व अतिक्रमण निरीक्षकांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. आंदोलन दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता म.न.पा. आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर येथे केले जाणार असून ढोल वाजवत निषेध व्यक्त केला जाईल.
पथविक्रेत्यांचा माल विनापत्र न घेता जप्त आहे.उचलेल्या मालाची यादी दिलेली नाही.नाशवंत माल मागणी केल्याच्या दिवशी परत देण्याचा नियम असताना पीडित विक्रेत्यांनी वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली गेली.अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत,पालिकेच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला जाणार आहे.