सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

“बाजीराव पेशवे हे मागील 500 वर्षातील सर्वोत्तम योद्धे; अमित शाह यांचे प्रतिपादन

डिजिटल पुणे    04-07-2025 15:34:43

 पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांनी पुण्यामध्ये बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले आहे. खडकवासला येथील एनडीए येथे स्वराज्याचे पेशवे अर्थात बाजीराव पेशवे यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. एनडीएमध्ये सैनिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना शौर्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. अमित शाह यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते.यावेळी अमित शाह यांनी बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यासाठी एनडीए ही सर्वोत्तम जागा असल्याचे देखील सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अनावरण सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या लढवय्या इतिहासाचा पुनरुच्चार केला. यावेळी अमित शाह म्हणाले की, “पुणे हे स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे अदभूत आहे. केवळ वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्य हा ध्यास घेतला असेल आणि आपल्या आय़ुष्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेल. केवळ 12 वर्षाचा युवक हा देशाला स्वातंत्र्य देण्याची भावना निर्माण करतो. आणि सर्व शाहींच्या विरोधात लढा देतो ही एक अकल्पनीय पराक्रम आहे. केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात स्वराज्याचा संस्कार पेरले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराबाई, धनाजी, संताजी अशा अनेकांनी हा विचार जपला,” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “केवळ 19 व्या वर्षी शाहू महाराजांनी त्यांची पारख करुन त्यांना पेशवे म्हणून निवडले. पेशवे झाल्यानंतर त्यांनी 20 वर्षात 41 युद्ध केली. आणि त्यातील एकामध्येही हार मिळवली नाही. असा पराक्रम कोणत्याही सेनापतीने केला नसेल. मृत्यूपर्यंत त्यांनी पराजयाला आपल्या जवळ देखील येऊ दिले नाही. अशा वीर सेनानींचा पुतळा लावण्याचे सर्वात उत्तम स्थान हे एनडीए आहे. बाजीराव पेशवे हे आज काळातही सर्वांचे आदर्श आहेत. बाजीराव पेशवे यांचा पुतळा माझ्या गावामध्ये देखील आहे. एनडीए ही जागा बाजीरावांचा पुतळ्यासाठी अतिशय योग्य आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या देशांतील जवानांना हा पुतळा युद्धातील नीती, समर्पण, व्हूरचना, देशभक्ती आणि युद्धातील बलिदान याची प्रेरणा बाजीराव पेशवे देत आहेत. मागील 500 वर्षातील या सर्व गुणांचे सर्वात्तम उदाहरण असेल तर ते मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून सांगतो ते केवळ श्रीमंत बाजीराव पेशव्यांमध्येच आहे” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती